Wednesday, April 24, 2019

Marathi Poetry Slam साठी संगीतबद्ध कवितांची निर्मिती

( Marathi Poetry Slam साठी खालील संगीतबद्ध कवितांच्या निर्मितीस मदत )

मनापासून मनापर्यंत. ..!




Marathi Poetry Slam

   

           काव्य  :  विपुल वर्धे   



येशील का?

पेनाच्या शाईवर?
कोऱ्या कागदाच्या वहीवर?
उतरशील का निर्मळ
कवितांच्या ओळींवर?

येशील का?

प्रितीच्या गाण्यांवर?
आठवणीतल्या पावसावर?
उतरशील का निर्मळ
हिरव्या दवबिंदूंवर?

येशील का?

हसण्यातल्या खळीवर?
रुसलेल्या आसवांवर?
उतरशील का निर्मळ
पाणावलेल्या डोळ्यांवर?

येशील का?

थांबलोय मी,
अश्रू तुझे पुसायला,
तुला आणखी रुसवायला,
माझ्या मध्ये मिळवायला,
बाकी शून्य उरायला. ..

येशील का? येशील का? ?
  
www.MarathiPoetrySlam.blogspot.in


मनापासून मनापर्यंत. ..!



Marathi Poetry Slam

   

           काव्य  :  विशाल इंगळे   



काही काही पानं
कोरीच बरी असतात. ..
म्हणूनंच पुस्तकातलं
कुठलं न कुठलं पान कोरंच असतं. ..
मी पण एक पान कोरंच ठेवलं होतं. ..
मुद्दामच. ..!
पण आज रहावलंच नाही. ..
उठलो आणि ओरखडल्या,
आयुष्याच्या कोऱ्या कागदावर
रात्रीतल्या आठवणींच्या सावल्या. ..!
लिहिल्यावर वाटलं
पान जरा जास्तच काळं झालंय कदाचित. ..
काही शब्द खोडावी म्हंटलं
आणि ओढल्या उभ्या आडव्या रेषा. ..!
ऐवढी खोडताड?
आता फक्त पान राहिलंय
फाडून फेकन्याच्या लायकिचं. ..
फाडून गोळा केला आणि दिलं फेकून
कचरापेटीत. ..
फाटलेलं पुस्तक कोण हाती घेइल?
कोण वाचणार या छिन्नविछिन्न अवस्थेतील
विस्कटलेली कविता. ..?
देवाजवळच्या दिव्यावर अचानक लक्ष गेलं. ..
आणि पेटवली चिता
पुस्तकाच्या एक एका पानाची. ..
आता त्या कोऱ्या पानांवर
कधीच लिहिणार नाही. ..
सांगणार ही नाही कुणाला
देवघरातल्या कागदाच्या राखेची कहानी. ..
काही पानं जशी असतात तशीच बरी
असतात. ..
कोरीच. ..!
त्या पानावरचे शब्द
फक्त लिहिणाऱ्यासाठी असतात. ..
पानावर नाही,
मनावर कोरलेले. ..! !!
  
www.MarathiPoetrySlam.blogspot.in


मनापासून मनापर्यंत. ..!



Marathi Poetry Slam

   

           काव्य-वाचन  :  पियुष वानखडे


वाटतं एक दिवस आयुष्य
कारण नसताना घालवावं...
फिरत रहावं असंच उनाडकं
डोंगर रानातून...
चालत रहावं
धाड धाड
कशाचीही पर्वा न करता...
बघावं किती तापतोय सूर्य
रागाच्या भरात...
किती चटके देईल ही माती...
किती ताकद आहे वाऱ्यात...
एक दिवस जगावं
तत्व बित्व सोडून...
एक दिवस बघावं प्रवाहाच्या
उलट्या दिशेनं पोहून...
चन्द्र,सूर्य,वादळ,वारा यांना
कंटाळलोय मी फार...
स्वतःसाठीही एक कविता
करावीशी वाटते यार...
  
www.MarathiPoetrySlam.blogspot.in


मनापासून मनापर्यंत. ..!




Marathi Poetry Slam

   
          
गायन : महेश देशमुख
काव्य : रुपेश देशमुख



नको उभारु असा दुरावा एक फोन कर...!
ठरेल खोटा तुझाच दावा एक फोन कर...!

असे कशाला एक-एकटे झुरायचे तू..?
अर्धा वाटा मला मिळावा एक फोन कर...!

नकोस बोलू एक शब्दही फक्त रिंग दे...
तुझा अबोला मला कळावा एक फोन कर...!

म्हणायची हक्काने मजला घरी निघुन ये...
पुन्हा येवुदे तसा बुलावा एक फोन कर...!

क्षणोक्षणी मी तुझी आठवण काढत असते
ह्या गोष्टीला काय पुरावा? एक फोन कर...!

  
www.MarathiPoetrySlam.blogspot.in

Monday, August 13, 2018

शिवराय by अमर किर्दक


हा कार्यक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करा. ..